13-year-old Yu Zidi wins Asian Games gold
esakal
Yu Zidi women’s 200m butterfly Asian Games 2026: चीनची १३ वर्षीय जलतरणपटू यू झिडी ही आशियाई विजेती बनली आहे. तिने महिलांच्या २०० मीटर बटरफ्लाय फायनलमध्ये बाजी मारली आणि २:०५.०८ सेकंदाच्या स्पर्धा विक्रमी वेळेची नोंद केली. चँग मोहनला तीन सेकंदाच्या फरकामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे यू झिडी पुढील महिन्यात १४ वर्षांची होणार आहे. एवढ्या कमी वयात तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोठ्या व्यासपीठावर अनुभवी खेळाडूंना मागे टाकत दमदार कामगिरी केली.