Afghanistan Japan Asian Games cricket latest result
esakal
Afghanistan Malaysia Asian Games cricket latest result : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता सर्वांचे लक्ष श्रेयस अय्यरच्या पुरुष संघाकडे लागले आहे. भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. पण, आजपासून प्राथमिक फेरीच्या लढती सुरू झाल्या आणि दोन गटांत विभागलेल्या सहा संघातील चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. गुरुवारी झालेल्या दोन सामन्यांत अफगाणिस्तान व मलेशिया यांनी विजयी सुरुवात केली. आता कोणता संघ टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत भिडेल, याची उत्सुकता आहे.