IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

VIRAL VIDEO IND VS PAK FINAL: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी १५ धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज सैम अयूबने केलेलं सेलिब्रेशन चर्चेत आलं आहे. वैभवचा झेल उस्मान खानने घेतल्यानंतर सैम अयूबने हातात लहान मुलाला खेळवत असल्यासारखा जल्लोष केला.
VIRAL VIDEO IND VS PAK FINAL

VIRAL VIDEO IND VS PAK FINAL

esakal

Updated on: 

VIRAL VIDEO IND VS PAK FINAL: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (३ ऑक्टोबर) सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. हा सामना जपानमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवला जात आहे. भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताकडून डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी केली. मात्र, सामना सुरू होताच वैभव सूर्यवंशी १५ धावांवर बाद झाला. त्याला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज सैम अयूबने केलेलं सेलिब्रेशन सध्या चर्चेत आलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com