Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Shafali Verma T20I Century Records: आशियाई क्रीडा स्पर्धेत शफाली वर्माने उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध नाबाद शतक केले. तिने यासह विश्वविक्रमासह ६ विक्रम केले आहेत.
Shafali Verma Asian Games Century Records

Shafali Verma Asian Games Century Records

Sakal

Updated on

Shafali Verma Asian Games Century Records: भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली असल्याने पदक निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाने रविवारी उपांत्य फेरीत बांगलादेश महिला संघाला ११४ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयात युवा शफाली वर्माने वादळी शतक करत मोलाचा वाटा उचलला. तिने या शतकासह ६ मोठे विक्रमही केले आहेत.

या सामन्यात शफालीने ४९ चेंडूत ३ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९५ धावां उभारल्या. त्यानंतर बांगलादेश संघाला १५.४ षटकातच ८१ धावांवर सर्वबाद केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता भारतीय संघ २२ सप्टेंबरला सुवर्णपदकासाठी श्रीलंका महिला संघाविरुद्ध सामना खेळले.

Shafali Verma Asian Games Century Records
Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com