

Rudrankksh Patil, Himanshu Dhillon and Parth Mane | Shooting | Asian Games 2026
Sakal
India Wins Silver in Men's 10m Air Rifle Event at Asian Games: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी अफलातून सुरुवात केली आहे. सोमवारी देखील भारतीय नेमबाजांनी पदकांचे खाते उघडले आहे.
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या संघाने रौप्य पदक जिंकले आहे. भारताच्या संघात हिमांशु धिल्लोन, पार्थ माने आणि रुद्रांश पाटील (Rudrankksh Patil, Himanshu Dhillon and Parth Mane) यांचा समावेश आहे.
हिमांशु, पार्थ आणि रुद्रांश यांनी मिळून १८९०.१ पाँइंट्स मिळवत अंतिम फेरीत दुसरा क्रमांक मिळवला. त्यांचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. चीनच्या शेंग लिहाओ, मा सिहान आणि झांग चांगहोंग यांचा समावेश असलेल्या संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी १८९९.० पाँइंट्स मिळवला. तसेच दक्षिण कोरियाने १८८४.२ पाँइंट्सह कांस्य पदक जिंकले.