“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Daren Sammy X post about travel delay in Kolkata: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ अद्याप कोलकात्यात अडकलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल पाच दिवस उलटल्यानंतरही परतीच्या प्रवासाबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संघात नाराजीचे वातावरण आहे.
DAREN SAMMY QUESTIONS DELAY AS WEST INDIES REMAIN STUCK IN KOLKATA

DAREN SAMMY QUESTIONS DELAY AS WEST INDIES REMAIN STUCK IN KOLKATA

esakal

Updated on

Daren Sammy reacts after West Indies stuck in Kolkata for 5 days: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान सुपर ८ फेरीतच संपुष्टात येऊनही वेस्ट इंडिजचा संघ अजूनही कोलकाता येथे अडकला आहे. विडींजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी याने त्याचा संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. त्याने आज पाठोपाठ दोन पोस्ट केल्या. पहिल्या पोस्टमध्ये, 'मला घरी जायचं आहे' असे त्याने लिहिले. त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, किमान आम्हाला अपडेट्स तरी द्या, काहीतरी सांगा. आज, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात. पाच दिवस झाले आम्ही इथे अडकलोय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com