Will Jacks’ flying screamer at deep backward square sent Steve Smith
esakal
Will Jacks flying catch AUS vs ENG 2nd Test video: ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. जो रूटच्या ( Joe Root ) शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ३३४ धावा केल्या आणि त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाकडून तीन अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith ) शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना विल जॅक्सने अफलातून कॅच घेतला अन् इंग्लंडचे चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले.