
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना विश्वविक्रमी ठरला आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावसंख्येचं लक्ष्य पार करत इंग्लंडला ५ विकेट्सने पराभूत केलं आहे.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितिही विक्रमी ३५२ धावांचे लक्ष्य पार केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात जॉश इंग्लिसने शतक करत महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ५ विकेट्स गमावत ३५६ धावा करून पूर्ण केले. हे लक्ष्य पूर्ण करताना इंग्लिससोबतच इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले.