Suryakumar Yadav reacts after India’s defeat at MCG — praises Abhishek Sharma’s fighting knock.
esakal
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारतीय फलंदाजांनी आज चाहत्यांना निराश केले. अभिषेक शर्मा व हर्षित राणा हे दोघं खेळले नसते, तर भारतीय संघाचे शंभरीपार जाण्याचेही वांदे होते. भारताचा संपूर्ण संघ १२५ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने १३.२ षटकांत ६ बाद १२६ धावा करून दुसरी ट्वेंटी-२० जिंकली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि येत्या रविवारी ( २ नोव्हेंबर) भारतीय संघ मालिकेत बरोबरीसाठी उतरेल. ४-०-१३-३ अशी अप्रतिम स्पेल टाकून भारतीय संघाला सुरुवातीलाच हादरे देणारा जॉश हेझलवूड सामनावीर ठरला.