IND vs AUS 2nd T20I Live : W,W,W,W! भारताने १२ धावांच गमावल्या चार विकेट्स, Josh Hazlewoodने केला करेक्ट कार्यक्रम

Australia vs India 2nd T20I Marathi Cricket : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूडने भारतीय डावाला अक्षरशः हादरवून सोडलं! अवघ्या १२ धावांच्या आत भारताने सलग चार विकेट्स गमावल्या. शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे सर्वच फलंदाज एकामागोमाग बाद झाले.
Shubman Gill and Sanju Samson depart early as Australia dominate the opening overs in the 2nd T20I.

Shubman Gill and Sanju Samson depart early as Australia dominate the opening overs in the 2nd T20I.

esakal

Updated on

India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात साजेशी सुरुवात करता आलेली नाही. शुभमन गिल ( Shubman Gill) पहिल्याच चेंडूवर बाद होता होता वाचला, तरीही त्याने तिसऱ्या षटकात चुकीचा फटका खेळला.. त्यात बढती मिळालेल्या संजू सॅमसन ( Sanju Samson) यालाही संधीचं सोनं करता आले नाही. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर आत येणारा चेंडू ओळखण्यात तो अपयशी ठरला. भारताने १२ धावांच्या अंतराने ४ विकेट्स गमावल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com