Indian and Australian players wear black armbands during the 2nd T20I to honour Ben Austin’s memory.
esakal
Cricket
IND vs AUS 2nd T20I Live : भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दंडावर काळी फित बांधून का खेळतायेत? चटका लावणारी बातमी
Australia vs India 2nd T20I Marathi Cricket News:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काळी फित बांधून सामना खेळला. 
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. सूर्यकुमार यादवनेही आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती सांगितले, परंतु त्याचवेळी त्याने अर्शदीप सिंगला ( Arshdeep Singh) आजच्या सामन्यातही संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. भारत आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करताच उतरला आहे. त्यामुळे पुन्हा ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेणारा अर्शदीप संघाबाहेर बसला आहे.
