

Australia vs India Day-Night Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू झाला. हा सामना ऍडलेडमधील द ओव्हल स्टेडियमवर दिवस-रात्र प्रकारात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ८७.३ षटकात ३३७ धावांवर सर्वबाद झाला.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १५७ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली.