
Australia vs India 2nd Test at Adelaide: शुक्रवारपासून (६ डिसेंबर) ऍडलेड ओव्हलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी (७ डिसेंबर) लंच ब्रेकपर्यंत ५९ षटकात ४ बाद १९१ धावा करत ११ धावांची आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, पहिल्या सत्रात तिसऱ्या पंचांनी दिलेला एक निर्णय वादात अडकला आहे.