Australia vs India 3rd TestSakal
Cricket
IND vs AUS: गॅबा कसोटीचा निकाल लागणार? ऑस्ट्रेलियाने डाव घोषित करत भारतासमोर ठेवलं मोठं लक्ष्य
Australia vs India 3rd Test: ब्रिस्बेनमधील गॅबावर होत असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव झटपट घोषित करत भारतासमोर विजयासाठी लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागू शकतो.
Australia vs India 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच ब्रिस्बेनवर होत असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्यातील बराच वेळ पावसामुळे वाया जाऊनही आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की सामन्याचा निकाल लागू शकतो. ऑस्ट्रेलियानेही याच दृष्टीने धाडसी निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसरा डाव १८ षटकात ७ बाद ८९ धावा करत घोषित केला आहे. यासह त्यांनी पहिल्या डावातील १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

