IND vs AUS: संकटमोचक! भारतासाठी फॉलो-ऑन टाळणाऱ्या बुमराह-आकाश दीपच्या जोडीने मोडला ३३ वर्षे जूना विक्रम

Jasprit Bumrah - Akash Deep 10th Partnership: ब्रिस्बेन कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप हे भारतासाठी संकटमोचक ठरले. त्यांनी भारतावरील फॉलोऑनचे संकट टाळले. यासोबतच त्यांनी ३३ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.
India vs Australia 3rd Test
Akash Deep - Jasprit BumrahSakal
Updated on

Australia vs India 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना नाट्यपूर्ण ठरला. ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बराचवेळ पावसाचाच व्यत्यय पाहायला मिळाला. त्यामुळे बराच खेळ वाया गेला. पण असे असले तरी काही खेळाडूंनी या सामन्यात मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली.

यामध्ये आता जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांचाही समावेश आहे. भारतीय संघांच्या या वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात फलंदाजीत मोठा पराक्रम करत ३३ वर्षे जुन्या विक्रमाला मागे टाकले आहे.

India vs Australia 3rd Test
IND vs AUS, 3rd Test: भारताने Follow on टाळला! केएल राहुल-जडेजाच्या फिफ्टींनंतर बुमराह-आकाशची चिवट झुंज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com