ऑस्ट्रेलियाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यांत विजय
वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका ५-० अशी जिंकली
टीम इंडियाच्या मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी
Australia wins 5-0 T20I series against West Indies : ऑस्ट्रेलियाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३ विकेट्स व १८ चेंडू राखून विजय मिळवून मालिका ५-० अशी खिशात टाकली. या कामगिरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ हा टीम इंडियानंतर मोठा विक्रम नोंदवणारा दुसरा संघ ठरला. भारताने २०२० मध्ये असा पराक्रम केला होता आणि आता ऑस्ट्रेलियाच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. पाचव्या सामन्यात वेस्ट इंडिजचे १७१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत पार केले.