19-year-old Sam Konstas Australia A performance vs India A
esakal
१९ वर्षीय सॅन कॉन्स्टासने लखनौच्या एकाना स्टेडियमवर भारत अ विरुद्ध दमदार शतक झळकावले.
कॅम्पबेल केलावेसह १९८ धावांची भक्कम सलामी भागीदारी उभारली.
हर्ष दुबेने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅकस्वीनी आणि नंतर कॉन्स्टासला बाद केले.
SAM KONSTAS SMASHED HUNDRED AGAINST INDIA A IN THE EKANA STADIUM : कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतात आलेल्या १९ वर्षीय सॅन कॉन्स्टासने खणखणीत शतक झळकावले. ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर आला आहे आणि आजपासून भारत अ संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या दिवशी मैदान गाजवले. चार दिवसांच्या या पहिल्या लढतीत कॉन्स्टास व कॅम्पबेल केलावे या दोघांनी सलामीला येताना भारतीय गोलंदाजांना दमवले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ खेळतोय.