
Australia vs India 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज चमकले. पहिल्या दिवशी भारताचा संघ १८५ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही पहिली विकेट पहिल्याच दिवशी गमावली होती.
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५१ षटकात १८१ धावांत संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला ४ धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली, यासोबतच त्यांना क्षेत्ररक्षकांचीही चांगली साथ मिळाली. क्षेत्ररक्षकांनी चांगले झेल घेतल्याने गोलंदाजांना मदत मिळाली.