
सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू झाली आहे. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा ३८ वर्षीय अष्टपैलू मोझेस हेन्रिक्सने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हेन्रिक्सने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहे. तो न्यू साऊथ वेल्स संघाचा कर्णधारही होता.
दरम्यान, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो न्यू साऊथ वेल्ससाठी लिस्ट ए क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच त्याचा बिग बॅश लीगसाठी सिडनी सिक्सर्ससाठी आणखी एक हंगामाचा करार बाकी आहे. तो या संघाचा कर्णधारही आहे.