
भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांमध्ये आता विराट कोहलीचेही नाव घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात विराटने दमदार कामगिरी केली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे.
त्याने जून २०२४ च्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दरम्यान, नुकताच विराट आयपीएल २०२५ साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल झाला आहे. यावेळी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इनोवेशन लॅबमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.