Full list of Australia squad for WTC Final 2025 and impact on IPL : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांचे सुधारित वेळापत्रक काल बीसीसीआयने जाहीर केले. १७ मे पासून लीगला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि ३ जूनला अंतिम सामना खेळवला जाईल. देशातील सहा विविध शहरांमध्ये हे सामने होणार असले तरी प्ले ऑफच्या लढतींचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याने फ्रँचायझींना आनंद होत असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धक्का दिला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने १६ सदस्यीय संघ आज जाहीर केला आणि त्यामुळे आयपीएल फ्रँचायझींना धक्का बसला आहे.