
क्रिकेटमध्ये एखादा बरेच खेळाडू पस्तीशी ते चाळिशीदरम्यान निवृत्तीचा विचार करतात, काही खेळाडू फॉर्म सापडत नसल्यानेही निवृत्तीची घोषणा करतात. पण ऑस्ट्रेलियाच्या २७ वर्षीय प्रतिभाशाली खेळाडू विल पुकोवस्कीला सातत्याने कन्कशनचा सामना करावा लागत असल्याने निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक म्हणून विल पुकोवस्कीकडे पाहिले जात होते. मात्र, त्याला खेळताना बऱ्याचदा डोक्याला किंवा मानेजवळ चेंडू लागला, त्यामुळे खूप काळ त्याला कन्कशनच्या कारणाने क्रिकेटपासून दूर रहावे लागले.
इतकेच नाही, तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला. त्याला अजूनही भीतीदायक लक्षणे जाणवतात. अजूनही त्याला भीती वाटत असल्याचे त्याने सांगितले.