
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवला. हा बंगळुरूचा वानखेडे स्टेडियमवर १० वर्षांनी मिळवलेला पहिला विजय ठरला. त्यांनी २०१५ नंतर पहिल्यांचा या स्टेडियमवर विजय मिळवला.
गेल्यावर्षी याच मैदानात मुंबईने बंगळुरूचा दारुण पराभव केला होता, ज्याचा सोमवारी बंगळुरूने वचपा काढला. बंगळुरूचा यंदाच्या हंगामातील हा चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला, तर मुंबईचा पाच सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे. तसेच घरच्या मैदानातील यंदाच्या हंगामातील पहिला पराभव आहे.