ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Australia Knocked Out of T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेने सुपर-८ फेरीत प्रवेश केल्याने ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपले आहे.
Australia Cricket Team

Australia Cricket Team

Sakal

Updated on

Australia Eliminated from T20 World Cup as Zimbabwe Qualify for Super 8: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत मोठा उलटफेर झाला आहे. माजी चॅम्पियन आणि आयसीसी स्पर्धांमधील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मंगळवारी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात पाल्लेकेले येथे होणारा सामना पावसामुळे रद्द झाला.

या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे (Rain) नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ पाँइंट देण्यात आला. परिणामी झिम्बाब्वेचे ३ सामन्यांतून ५ पाँइंट्स झाले. त्यामुळे बी गटातून श्रीलंकेपाठोपाठ झिम्बाब्वेने सुपर - ८ फेरीतील (Super 8) प्रवेश पक्का केला. झिम्बाब्वेने (Zimbabwe) याआधी ओमान आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.

<div class="paragraphs"><p>Australia Cricket Team</p></div>
T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com