IND vs AUS : टीम इंडियाचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने बोलावला घातक गोलंदाज अन् तितकाच स्फोटक फलंदाज

Australia Squad 2nd Test: पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया पिंक बॉल टेस्टसाठी संघात बदल केला आहे.
Beau Webster
Beau Websteresakal
Updated on

Pink Ball Test Australia squad Beau Webster: ऑस्ट्रेलियावर घरच्या मैदानावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ०-१ असे पिछाडीवर जाण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या कल्पक नेतृत्वाखाली पर्थ कसोटीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी मिळवण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाने कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी आज संघ जाहीर केला असून त्यांनी वेगवान गोलंदाज अन् तितकाच स्फोटक फलंदाज म्हणून देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या ब्यू वेबस्टर ( Beau Webster ) चा संघात समावेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com