IPL च्या कारणाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश दौऱ्यासाठी कमिन्ससह 'या' प्रमुख खेळाडूंची निवड नाही

Australia Squad for PAK & BAN Tours: ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी काही दिवसात पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यांतील वनडे आणि टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे.
Australia Cricket Team

Australia Cricket Team

Sakal

Updated on

Cricket Australia Marathi News: ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी काळात पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. पण आयपीएलमध्ये खेळण्याचा ताण कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जॉश हॅझलवूड यांना आगामी पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती दिली आहे.

कमिन्स-स्टार्क-हॅझलवूड यांना विश्रांती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवोदितांना संधी दिली आहे. दोन महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या नव्या सर्कलसाठी या गोलंदाजांना ताजेतवाने ठेवायचे आहे.

Australia Cricket Team
T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com