T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?

Ricky Ponting on Australia’s early T20 World Cup exit: टी-२० विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीका केली आहे. झिम्बाब्वेकडून पराभव आणि श्रीलंकेविरुद्ध अपयशामुळे ऑस्ट्रेलिया सुपर-८ फेरीपासून बाहेर राहिले.
Ricky Ponting on Australia’s early T20 World Cup exit

Ricky Ponting on Australia’s early T20 World Cup exit

Sakal

Updated on

Ricky Ponting on Australia’s early T20 World Cup exit: यंदाच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान साखळीत संपुष्टात आले. २००९ नंतर त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या तीन सामन्यांत फक्त आयर्लंडविरुद्ध विजय मिळवता आला. पण त्यांना झिम्बाब्वे आणि यजमान श्रीलंका संघांनी पराभवचा धक्का दिला.

परिणामी ऑस्ट्रेलिया सुपर-८ फेरीपासून लांब राहिले. ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीवर माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीका केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ही मोहिम अत्यंत निराशाजनक असल्याचे स्पष्ट केल.

ऑस्ट्रेलिया संघाला (Australia Cricket Team) या स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंच्या दुखापतीची चिंता होती. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड हे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले, तर पहिल्या दोन सामन्यात कर्णधार मिचेल मार्शही खेळला नाही. टीम डेव्हिडही सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. पण या दुखापतीच्या चिंता असल्या तरी झिम्बाब्वेकडून झालेला पराभवानंतर त्यांनी हा वर्ल्ड कप आपल्या हातून गेला, असाच विचार केला असेल, असं पाँटिंग म्हणाला.

<div class="paragraphs"><p>Ricky Ponting on Australia’s early T20 World Cup exit</p></div>
SL vs ZIM, T20 WC: झिम्बाब्वेचा आणखी एक दे धक्का! ऑस्ट्रेलियानंतर यजमान श्रीलंकेला नमवले; टीम इंडियाला आव्हान दिले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com