IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

Rain May Knock Australia Out of T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या भवितव्यही आजच्या पावसावर अवलंबून आहे. जाणून घ्या समीकरण.
Australia Cricket Team

Australia Cricket Team

Sakal

Updated on

Zimbabwe vs Ireland Rain Update: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ साठीची शर्यत रोमांचक झाली आहे. पहिल्या फेरीतील सी आणि डी ग्रुपमधून कोणते संघ सुपर ८ मध्ये जाणार हे निश्चित झाले असले, तरी अद्याप ए आणि बी गटातील शर्यत चुरशीची ठरत आहे.

विशेष म्हणजे माजी विजेते ऑस्ट्रेलियाचे (Australia Cricket Team) भवितव्य झिम्बाब्वे संघाच्या (Zimbabwe) हातात आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व ठेवले आहे. पण सध्या त्यांच्यावर टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत (T20 World Cup 2026) पहिल्याच फेरीतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.

<div class="paragraphs"><p>Australia Cricket Team</p></div>
SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com