

AUS vs BAN
esakal
Australia vs Bangladesh: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ एरिना मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा डाव आणि ५१ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली.
डार्विनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे मॅके कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही.