
Border - Gavaskar Trophy 1st Test: भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटीला सुरुवात झाली आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडिमय (Perth Stadium) येथे शुक्रवारपासून (२२ नोव्हेंबर) सुरु झाला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिल्या दोन तासातच भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांसमोर संघर्ष करावा लागला आहे.