
Australia vs India 3rd Test: ब्रिस्बेनमधील द गॅबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१५ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन संघ वरचढ असल्याचे दिसून आले आहे.
त्यातही हा दिवस ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी गाजवला. त्यांनी शानदार शतके केली. पण दिवसाच्या शेवटी बुमराहने ५ विकेट्स पूर्ण करत भारतीय चाहत्यांच्या दु:खावर फुंकर घातली. दुसरा दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०१ षटकात ७ बाद ४०५ धावा केल्या.