
Australia vs India 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दोन दिवसात तरी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले आहे. त्याचे हे या मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याने ऍडलेडला झालेल्या दुसऱ्या कसोटीतही शतक केले होते.