India vs Australia 3rd TestSakal
Cricket
IND vs AUS, 3rd Test: विराट, पंत, गिल...सर्वच टॉप ऑर्डर बाद! एकीकडे पावसाचा लंपडाव अन् दुसरीकडे टीम इंडियाची दैना
Australia vs India Gabba Test 3rd Day: भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. पण त्याचबरोबर भारताच्या फलंदाजीची सुरुवातही अत्यंत खराब झाल्याचे दिसून आले, त्यामुळे दिवस संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी होती.
Australia vs India 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द गॅबा स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे बराच व्यत्यय आला आहे. पहिल्या दिवसातही पावसामुळे केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण दिवस खेळ झाला.
परंतु, तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने खोडा घातला आहे. सुरुवातीपासून सातत्याने पाऊस ये-जा करत असल्याने बराचवेळा व्यत्यय आला. पण त्यातही भारताचा पहिला डाव सुरु असताना १४.१ षटकानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर मात्र दोन तासांहून अधिकवेळ पावसाचा व्यत्यय आला.
अखेर या व्यत्ययानंतर पुन्हा खेळ सुरू झाला, पण साधारण तीनच षटकांच्या खेळानंतर पुन्हा खेळ थांबला. अखेर सामनाधिकऱ्यांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने ४ बाद ५१ धावा केल्या आहेत.