
Australia vs India Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे दिसून येत आहे. पण त्यातही शेवटच्या सत्रात भारतीय संघाने पुनरागमन केल्याचे दिसले.
बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणवीर सॅम कोन्स्टास आणि उस्मान ख्वाजा हे दोने फलंदाजीला उतरले.