
Australia vs India 4th test: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नला झालेल्या कसोटी सामन्यात १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत चालला.
शेवटच्या दिवशी या सामन्यात कोणाच्याही बाजूने निकाल लागू शकत होता. परंतु, शेवटच्या सत्रात भारताने तब्बल ७ विकेट्स गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. परंतु, यादरम्यान, यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मोठा वाद झाला.