

Alyssa Healy - Harmanpreet Kaur
Sakal
Alyssa Healy Announces Retirement: फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारातील सामने दोन्ही महिला संघात खेळले जाणार आहेत.
आता या दौऱ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू एलिसा हेली (Alyssa Healy) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त (Retirement) होणार आहे. तिने याबाबत सोमवारी (१२ जानेवारी) घोषणा केली आहे.