
Australia vs India Sydney Test: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेला पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना ६ विकेट्सने जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.
यासोबतच ऑस्ट्रेलियाने तब्बल १० वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवरही नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१४-१५ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताने मायदेशात तसेच ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका जिंकत ऑस्ट्रेलियाला ट्रॉफीपासून लांब ठेवले होते.
मात्र, ऑस्ट्रेलियाने आता रविवारी (५ जानेवारी) मालिका जिंकून ट्रॉफीवरही नाव कोरले.