

Damien Martyn on Meningitis Recovery
Sakal
Damien Martyn on Meningitis Recovery: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. वैद्यकिय क्षेत्रात जेव्हा चमत्कार घडतात, तेव्हा अनेकदा ही म्हण चपखल बसते. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डेमियन मार्टिन यांच्याबाबतही असेच म्हणावे लागेल. क्रिकेट विश्वातून २०२५ च्या अखेरीस धक्कादायक बातमी समोर आली होती.
डेमियन मार्टिन (Damien Martyn) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. ५४ वर्षीय मार्टिन यांना मेंदूज्वर (meningitis) झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे ते मृत्यूशी लढाई देत होते. पण त्यांनी ही लढाई लढली आणि ते आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. याबाबत त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यांचा अनुभव सांगण्यासोबतच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाचे आभार मानले आहेत.