AUSTRALIAN CRICKET AWARDS : ट्रॅव्हिस हेडने सलग दुसऱ्या वर्षी जिंकला मानाचा पुरस्कार! वॉर्नर, पाँटिंग, वॉटसन यांच्या पंक्तित स्थान

Travis Head wins Allan Border Medal : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील मानाच्या अॅलन बॉर्डर मेडलवर पुन्हा एकदा ट्रॅव्हिस हेडने आपले नाव कोरले आहे. हेडने सलग दुसऱ्या वर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकत ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील दिग्गजांच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Australian Cricket Awards 2026 winners

Australian Cricket Awards 2026 winners

Updated on

Australian Cricket Awards 2026 winners: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड ( Travis Head ) याने सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलिया पुरस्कारांमध्ये बाजी मारली. त्याला अॅलन बॉर्डर मेडलच्या ( Allan Border Medals) चुरशीच्या शर्यतीत अॅलेक्स केरीला मागे टाकले आणि सलग दुसऱ्यांदा हा मेडल जिंकला. मिचल स्टार्सला वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या शेन वॉर्नच्या नावाचा पुरस्कार दिला गेला. मिचल मार्श व टीम डेव्हिड हे अनुक्रमे वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com