Australia team beat Scotland in 1st T20I ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. स्कॉटलंडने विजयासाठी ठेवलेले १५५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांत सहज पार केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी केली अन् अनेक विक्रमांना गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला...
स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५४ धावा केल्या. जॉर्ज मुन्सी ( २८), मॅथ्या क्रॉस ( २७) व कर्णधार रिची बेरिंग्टन ( २३) यांनी चांगला खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर झेव्हियर बार्टलेट व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या चेंडूवर धक्का बसला. जॅक फ्रेझर-मॅकगर्क भोपळ्यावर बाद झाला.
त्यानंतर हेड व कर्णधार मिचेल मार्श या जोडीने तुफान फटकेबाजी केली. हेडने १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२०त वेगवान अर्धशतकाच्या विक्रमात मार्कस स्टॉयनिससह ( १७ चेंडू वि. श्रीलंका २०२२) संयुक्त अव्वल स्थान पटकावले. त्याने डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम मोडला.
या दोघांनी पहिल्या सहा षटकांत ११३ धावा कुटल्या आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये फुल मेंबरने कुटलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. ऑस्ट्रेलियाने हा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर करताना दक्षिण आफ्रिकेचा ( १०२ धावा वि. वेस्ट इंडिज २०२३) विक्रम मोडला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये १००+ धावा करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला. रोमानियाने ( ११० वि. सर्बिया, २०२१), ऑस्ट्रेलिया ( ११३-१ वि. स्कॉटलंड, २०२४) आणि दक्षिण आफ्रिका ( १०२ धावा वि. वेस्ट इंडिज २०२३) यांनी हा पराक्रम केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ट्रेव्हिस हेडने ( ७३) अव्वल स्थान पटकावले. त्याने पॉल स्टर्लिंगचा ६७ धावांचा ( वि. वेस्ट इंडिज, २०२०) विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १५०+ धावा करण्याचा विक्रमही नावावर केला. त्यांनी आज ५८ चेंडूंत ३ बाद १५६ धावा केल्या. ओमानने याच वर्षी कम्बोडियाविरुद्ध ६६ चेंडूंत ६ बाद १५४ धावा केल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.