IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

Axar Patel Scripts History: भारताला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण असं असलं तरी अक्षर पटेलसाठी वैयक्तिकरित्या हा सामना विक्रमी ठरला. त्याने आजपर्यंत कोणत्याच भारतीय फिरकीपटूला न जमलेला विक्रम केला.
Axar Patel | England vs India 2nd T20I

Axar Patel | England vs India 2nd T20I

Sakal

Updated on

England vs India, 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात शनिवारी (४ जुलै) मँचेस्टरमध्ये टी२० मालिकेचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ४ विकेट्सने विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण असे असले तरी या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) मोठा विक्रम करत इतिहास घडवला आहे.

Axar Patel | England vs India 2nd T20I
IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com