IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

England beat India in 2nd T20I: भारतीय संघाला इंग्लंडने दुसऱ्या टी२० सामन्यात पराभवाचा धक्का दिला. भारतासाठी रवी बिश्नोईचे एक षटक अत्यंत महागात पडले. इंग्लंडसाठी जेकब बेथल विजयाचा नायक ठरला.
England beat India in 2nd T20I:

England beat India in 2nd T20I

Sakal

Updated on

England vs India,2nd T20I: इंग्लंडने भारताविरुद्ध मँचेस्टरमध्ये शनिवारी (४ जुलै) झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडने हा सामना ४ विकेट्सने जिंकला आणि ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडसाठी जेकब बेथलने (Jacob Bethell) अफलातून फलंदाजी करत नाबाद अर्धशतक केले.

या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंडने १९ षटकात ६ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्यांदाच १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना टी२०सामना जिंकला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला.

England beat India in 2nd T20I:
IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com