India bring back Axar Patel and Sanju Samson vs Zimbabwe
esakal
Cricket
T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?
India playing XI vs Zimbabwe T20 World Cup Super 8: वर्ल्ड कप स्पर्धेमधील सुपर ८ फेरीत भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दोन महत्त्वाचे बदल करत संघरचना अधिक मजबूत करण्याचे ठरवले आहे.
India semifinal qualification equation explained: भारत-झिम्बाब्वे यांच्यातला सुपर ८ फेरीतील सामना चेन्नईत होणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यासाठी नेट रन रेट महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये दोन बदल होणार, हे निश्चित झाले आहे. उप कर्णधार अक्षर पटेल ( Axar Patel) आजच्या सामन्यासाठी संघात पुनरागमन होत आहे. त्यासह संजू सॅमसनचेही ( Sanju Samson) आजच्या सामन्यात खेळणे पक्के झाले आहे. आता या दोघांसाठी कोणत्या दोन खेळाडूंना बाहेर बसवले जाईल?
