Vinod Kambli shares a heartwarming moment with Sachin Tendulkar during birthday celebrations
esakal
Vinod Kambli’s “Aaj Celebration To Banta Hai” for Sachin Goes Viral: सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या एका Video ने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. महान फलंदाज तेंडुलकरला त्याच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त विनोदने खास सरप्राईज दिले आहे. एका आईस्क्रीम ब्रँडने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, विनोदने त्यांच्यातील नात्याला उजाळा दिला आणि हा सोहळा शिवाजी पार्कमध्ये साजरा केला. "ए पार्टनर, आज सेलिब्रेशन तर बनतं. हॅपी बर्थडे, पार्टनर," असे विनोद व्हिडिओमध्ये म्हणाला.