
Ayush Mhatre Hundred: भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी ही लिस्ट-ए देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू असून साखळी फेरी सुरू आहे. स्पर्धेत मंगळवारी (३१ डिसेंबर) मुंबई आणि नागालँड हे संघ आमने सामने आहेत. हा सामना मुंबईचा १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेने गाजवला आहे. त्याने वादळी खेळ करत दीडशतक केले आहे.
या सामन्यात मुंबईने अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. कर्णधार श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे असे मुंबईचे महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात खेळले नाही. श्रेयसच्या जागेवर शार्दुल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करत आहे.