Ayush Mhatre ruled out of Mumbai’s next three Ranji matches
Ayush Mhatre undergoes surgery after right hamstring tear: भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि मुंबई संघाचा उप कर्णधार आयुष म्हात्रे याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगवर यशस्वी सर्जरी करण्यात आली आणि तो जवळपास २ ते ३ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. म्हात्रेला रणजी करंडक स्पर्धेत मुंबई विरुद्ध चंदीगड सामन्यात ग्रेड ४ ची दुखापत झाली होती आणि त्याने सामन्यातून माघार घेतली होती. आयपीएलच्या मागील पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या युवा फलंदाजाला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती आणि त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याला झालेली ही पहिलीच दुखापत आहे.