Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Babar Azam vs Virat Kohli T20 captain stats comparison: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. PSL 2026 मध्ये त्याने झळकावलेल्या शानदार शतकामुळे त्याने इतिहास रचला आहे. कर्णधार म्हणून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याचे हे ११वे शतक ठरले.
Babar Azam T20 centuries as captain record PSL

Babar Azam T20 centuries as captain record PSL

esakal

Updated on

Babar Azam breaks Faf du Plessis captaincy record: पेशावर झाल्मी संघाने पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये इस्लामाबाद युनायटेड संघावर विजय मिळवून क्वालिफायरमध्ये जागा पक्की केली. या सामन्यात पेशावरकडून बाबर आजमने ५९ चेंडूंत १०३ धावांची नाबाद खेळी केली आणि प्रथम फलंदाजीला आलेल्या संघाला ७ बाद २२१ धावांपर्यंत पोहोचवले. इस्लामाबाद संघाला ७० धावांनी हा सामना गमवावा लागला. त्यांचा संपूर्ण संघ १५१ धावांतच गारद झाला. या विजयासह पेशावर झाल्मी संघाने ३ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीतील जागा पक्की केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com