

Babar Azam Wicket
Babar Azam’s horror run continues with a 2-ball duck in BBL : बिग बॅश लीग २०२५-२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात असून बाद फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत मंगळवारी (२० जानेवारी) सिडनी सिक्सर्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स संघात क्वालिफायरचा सामना झाला.
पर्थला झालेल्या या सामन्यात पर्थ स्कॉचर्सने (Perth Scorchers) ४८ धावांनी विजय मिळवत थेट अंतिम सामना गाठला. मात्र सिडनी सिक्सर्सला (Sydney Sixers) अंतिम सामना गाठण्यासाठी आता आणखी एक संधी चॅलेंजर सामन्यात असेल. तथापि, या सामन्यातही बाबर आझमचे (Babar Azam) अपयश कायम राहिले आहे.