

Babar Azam Wicket
Sakal
Pakistan Beat Australia in 1st T20I: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून टी२० मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिला सामना लाहोरला गुरुवारी (२९ जानेवारी) झाला. हा सामना पाकिस्तानने २२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमलाही (Babar Azam) खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र पुन्हा एकदा त्याच्याकडून निराशा झाली तो मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. पण गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) विजय मिळवण्यात यश मिळवले.