Babar Azam: पाकिस्तानच्या T20 संघातून हकालपट्टीचे संकेत मिळताच बाबरने धरला दुसऱ्या संघाचा हात; नेटिझन्सकडून ट्रोलिंग

Babar Azam Makes Big Bash Move: पाकिस्तानच्या T20 संघातून वगळण्याचे संकेत मिळाल्यानंतर अनुभवी फलंदाज बाबर आझमने आता पुढचं पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे बाबरच्या करिअरचा नवा टप्पा सुरू होतोय असं मानलं जात आहे. पण नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले आहे.
Babar Azam Signs For Sydney Sixers
Babar Azam Signs For Sydney Sixers esakal
Updated on

Babar Azam joins Sydney Sixers for BBL 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या ट्वेंटी-२० संघात बदल करण्याच्या तयारीत आहेत. अशात बाबर आझम, हॅरिस रौफ, शाहिन शआह आफ्रिदी व मोहम्मद रिझवान यांना ट्वेंटी-२० संघाबाहेर बसवण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडनी सिक्सर्स संघाने त्याला करारबद्ध केले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी ही घोषणा केली. ट्वेंटी-२०त पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये बाबर ११३३० धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ११ शतकं व ९३ अर्धशतकं आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com